स्व:रचित कविता

*धम्मचक्र*

*माणसाना माणसात*
*आणल ज्या क्षणी*
*धम्मचक्र परिवर्तन दिनी*
*डॉ. बाबासाहेब आंबेडकरानी*
*बौद्ध धर्माची दिक्षा घेतली*
*या सोनेरी क्षणी*

*मानसा मानसातील मतभेद संपला*
*जगण्याचा नवा मार्ग मिळाला*
*नागपुर मुकामी*
*स्मरुनी धम्मचक्र परिवर्तन दिनाला*
*वंदन करुया दिक्षा भुमीला*

*पिंपळवृक्षा खाली तपश्चर्या करुनी*
*मानसांच्या दु:खाचे कारण शोधुनी*
*शांतीचा मार्ग जगाला*
*दिला बोधीसत्व गौतम बुद्धानी*

*स्मरुनी त्यांच्या कर्याला*
*धम्मचक्र परिवर्तन दिनी*
*नमन करुया*
 *तयाना सर्वानी*

*ननुरे डी एन*
*परभणी*


*🔰शौचालय*🔰
*चाल*: नेहमीच राया तुमची घाई ......

नांदाया मुलगी माझी
मी धाडणार नाही
आधी शौचालय बांधा घरी जावाई  !!धृ!!

 संडास उघड्यावर केल्यामुळे
रोग होतात लई
नांदाया मुलगी मी धाडणार नाही
आधी शौचालय बांधा घरी जावाई !!१!!

संडासला उघड्यावर जाया
हे स्त्री जातीला शोभता का बया
म्हणून नांदाया मुलगी माझी धाडणार नाही
आधी शौचालय बांधा घरी जावाई !!२!!

रस्त्याच्या कडेला शौचास बसाव लागत बाई
वहानांची वर्दळ लई
उठण्या - बसण्यातच बेजार होई
म्हणून नांदाया मुलगी माझी धाडणार नाही
आधी शौचालय घरी बांधा जावाई !!३!!

रात्री बे रात्रीलाही शौचास जावे लागे बाई
विंचु किड्याची भीतीही लई
म्हणून नांदाया मुलगी माझी धाडणार नाही
आधी शौचालय बांधा घरी जावाई !!४!!

विनंती माझी ऐका जावाई
शौचालय बांधायची करा घाई तेंव्हा मुलगी माझी
नांदाया आनंदाने येई
म्हणून आधी शौचालय बांधा घरी जावाई !!५!!

____________________
*कवी*:
*ननुरे डी एन*
*परभणी*


🔰 *केली निवडणूकीची दैना*🔰

आले निवडणूकीचे वारे
तालुक्याच्या तहसीलात पाळतात सारे
महादु , धोंडु , इरबा , नरबा
मिशिवर ताव देत म्हणतो केरबा

निवडणूकी पाई मी जमविला पैका फार
तेंव्हा मालक असावी नजर आमच्यावर
राहिन दोन वर्ष नौकर
पण मला सरपंच करा एकबार

गंपु मोठ्या शहाणा
म्हणे निवडणूकी आधिच
सरपंच मला म्हणा
कंबर बांधून उठला हरी
निवडणूकीची त्यानी केली होती तयारी
गावभर सांगतत तो सुटला
सरपंचकी साठी नंबर
माझाच पहिला लागला

हे ऐकुन ताडकन उठली विमला
आणि म्हणाली हरीला
सरपंचकीची स्वप्ने तुमची भंगली
कारण दारुने मते तुमची फुटली
सुजान मतदारांनो
व्यर्थ नका घालु मतदान
तुमच्या अमूल्य मतानी
आणा निवडून व्यक्ती महाण
तेंव्हाच पुर्ण होतील
जागतीक महासत्तांचे स्वप्न पुर्ण

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

*कवी*
*ननुरे डी एन*
*परभणी*

🔰 *आस नयनी*🔰

ऱ्हदयाच्या कोऱ्या कागदावर
प्रेनाचे शब्द लिहण्याची
आस नयनी लगली तुज पहाण्याची !!धृ!!

बागेत भेटण्याची
मनातील गुपीत सांगण्याची गोड गोड बोलण्याची
प्रेमाची फुले वहाण्याची
आस नयनी लागली
तुझ पहाण्याची !!१!!

ऱ्हदयाच्या सागरात
मनाच्या बंधाऱ्याय
प्रेमरुपी नौका सोडण्याची
आस नयनी लागली
तुझ पहाण्याची !!२!!

प्रेम आहे तुझ्यावरती
कसे सांगु मी तुझला
पंख मागुनी देवाला
येईन तुझ्या भेटीला
आस नयनी लागली
तुझ पहाण्याची !!३!!

तुझ पहाताच
मनाची बाग फुलु लागेल
गरज आहे प्रेमाची पालवी जोपासण्याची
आस नयनी लागली
तुझ पहाण्याची !!४!!

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

*कवी*
*ननुरे डी एन*
*परभणी*

✍🏻 *माहेर*✍🏻

क्षण आनंदाचा
 असतो माहेरी
जसे भोजनातील शिरापुरी

मुलगी असते
 दोन्ही घरचा आधार
सेवेचे ठिकाण सासर
तर मायेच उधळण असते माहेर

मुलगा घरचा वारीस
तर मुलगी असते पणती
जे स्वत: जळुन
दुसऱ्याला प्रकाश देती
तरी ही जन्मा आधी गर्भात
तर लग्नानंतर सासरी
का करती हत्या ही मानव जाती

जसे तीला माहेर
तसेच सासर ही जवळचे असते
सासुसासरे पतीचे मनोभावे
सेवा करते
तरी ही तिच्याच वाट्याला त्रास का ?
याचे उत्तर ती नेहमी शोधत असते

माहेर सासर
सारखेच तीला वाटु द्या
त्या साठीच सासरच्यानी ही
माहेर सारखीच माया असु द्या
याच आशेवर ती जगते
सर्वांच्या प्रेमासाठी च ती
दिनरात राबते
✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻
*ननुरे डी एन*
*परभणी*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: