-------------------------------------------------------------
---------------------------------------------------------
-------------------------------------------------------
-------------------------------------------------------------
आंतरजिल्हा बदली online आर्ज केल्या नंतर करावयाची कामे...........................
*सरल महत्वाचे* :
*प्रदीप भोसले,हवेली,पुणे*
➡ *Teacher-Transfer Form भरल्यानंतर काय करावे,या बाबत सूचना*
आंतर जिल्हा बदली फॉर्म भरून मुख्याध्यापक login मधून एकदा verify केला की त्यानंतर त्यात चूक झालेली असेल तरी ती दुरुस्थ करता येत नाही. *ट्रान्सफर फॉर्म हा कोणत्याही login मधून return करण्याची सुविधा देण्यात आलेली नाही आहे हे लक्षात घ्यावे*.म्हणून सर्वांनी हा फॉर्म काळजीपूर्वक verify करावा.बऱ्याच शिक्षकांना असे वाटते की मुख्याध्यापक login मधून ट्रान्स्फर फॉर्म भरला की तो फॉर्म गटशिक्षणाधिकारी यांच्या login मधून verify करावा लागतो.परंतु असे नाही आहे. *ट्रान्सफर फॉर्म मुख्याध्यापक login मधून verify केल्यावर त्यानंतर तो फॉर्म कोणत्याही login ला verify करण्यासाठी फॉरवर्ड केला जात नाही हे लक्षात घ्यावे.सदर फॉर्म हा मुख्याध्यापक login मधून verify केला की या फॉर्म ची प्रिंट काढावी.या फॉर्म ची प्रिंट व त्या प्रिंटेड फॉर्म मध्ये सांगितल्या प्रमाणे योग्य त्या कागद पत्रांची एक प्रत गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे माहितीसाठी द्यावी.गटशिक्षणाधिकारी हे शिक्षकांनी दिलेला फॉर्म व कागदपत्रांची तपासणी करून आपली स्वाक्षरी करतील व सदर फॉर्म हा आपाल्याजवळ जमा करून घेतील.शिक्षकांनी ही प्रत कार्यालयात जमा केल्याची पोहोच आपल्याकडे घेऊन ठेवण्यास हरकत नाही.*
गटशिक्षणाधिकारी यांनी *योग्य वेळी हे कागदपत्रे आपल्या जिल्ह्याच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्या मार्फत ग्राम विकास मंत्रालयाकडे तपासणीसाठी पाठवायचे आहे याची नोंद घ्यावी*.या संबंधी योग्य वेळी सूचना देण्यात येणार आहे.
समजा शिक्षकांनी आपला आंतरजिल्हा बदली साठीचा फॉर्म भरलेला आहे व त्यानंतर हा फॉर्म गटशिक्षणाधिकारी लॉगिन ला जमा करताना गटशिक्षणाधिकारी यांच्या असे लक्षात आले की,सदर फॉर्म भरताना काही चुका झालेल्या आहेत. *अशा वेळी गटशिक्षणाधिकारी यांनी शिक्षकांनी भरलेला फॉर्म परत न करता आपणाकडे जमा करून घ्यावा.परंतु आपल्या निदर्शनास आलेली चूक ही शिक्षकांच्या लक्षात आणून द्यावी.तसेच ही झालेल्या चुकी बाबत नोंद ठेवावी.ज्या वेळी प्रत्यक्ष ट्रान्सफर प्रक्रिया सुरु होईल तेंव्हा योग्य वेळी अशा चुकीच्या फॉर्म विषयी आपणाकडून ही माहिती ग्रामविकास मंत्रालयाकडून मागवली जाणार आहे हे लक्षात घ्यावे.*
चुकीची माहिती भरून आपला फॉर्म स्वतः verify केल्याने भविष्यात काही अडचण निर्माण झाल्यास स्वतः अर्जदार त्यास जबाबदार असतील यामुळे आपला फॉर्म काळजीपूर्वक भरावा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा