ज्ञानरचनावाद

ज्ञानरचनावाद ज्ञानरचनावादी अध्यापन "पूर्वानुभवाच्या किंवा पूर्वज्ञानाच्या आधारे जेव्हा व्यक्ति नविन संकल्पनांची , संबोधांची रचना करते तेव्हा त्यातून अध्ययन घडते यास ज्ञानरचनावाद म्हणतात " वैशिष्ट्ये :-- 1⃣घोकंपट्टीपासून सुटका :- आकलन करून समजुन अभ्यास करता येतो . 2⃣शाळेबाहेरचे जग आणि शाळेतील शिकणे यांची सांगड घालता येते 3⃣अध्ययन कौशल्यांचा विकास :- श्रवण , भाषण, वाचन , लेखन ,संभाषण , अभिव्यक्ति या कौशल्याचा विकास करणे सोपे होत.े 4⃣नविन माहिती पूर्वज्ञानाशी जुळणारी असेल तर पूर्वीच्या ज्ञानात भर पड़ते . 5⃣आंतरक्रियेमुळे ज्ञाननिर्मितीला फायदा होतो. 📕📙 पाठ शिकवताना खालील कृती अवश्य करून घ्याव्यात.... 1⃣ पाठ एक दिवस आधी वाचुन येण्यास सांगा 2⃣पाठ मधील चित्र दाखवून मुलांचे गट👭👬 करून चर्चा घडवून आणा. 3⃣झालेली चर्चा प्रत्येक गटातील मुलाला🙎🙇 सांगण्याची संधी दया . 4⃣गटात चित्रावर आधारित पाच सहा ओळी माहिती लिहिण्यास सांगा 5⃣प्रत्येक गटातील मुलाला🙎🙇 माहिती वाचण्यास सांगा 6⃣पाठाचा आशय स्पष्ट करून सांगा . चर्चा घडवून आणा . 7⃣योग्य तेथे साहित्याचा📚 वापर करा . 8⃣नविन शब्दाचा वाक्यात उपयोग करून घ्या 9⃣संवादात्मक पाठ मुलांना पात्र देवून नाटयीकरणाद्वारे सादर करून घ्या . 1⃣0⃣ कविता साभिनय सादर करून घ्या . ↪आपल्या भूमिकेत थोडा बदल करून शिकणे ही क्रिया अधिक मनोरंजक करू या . आपण कमी बोलून मुलाना बोलते करून त्यांना व्यक्त होण्याची संधी उपलब्ध करून दया