मराठीचे शिलेदार समुह

🦋





🔻🦋🔻🦋🔻🦋🔻🦋🔻
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
    *🔰मराठीचे शिलेदार समुहाचे ई - व्यासपीठ🔰*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*🔶 'मराठीचे शिलेदार कविता' समुहात काल देण्यात आलेल्या विषयावर  निवडक समूह सदस्यांनी केलेले 'काव्यलेखन'.*🔶
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*मराठीचे शिलेदार समुहाचा उपक्रम*🚩
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
        *संकलन:कविता समूह २,३,४,५*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🙏🙏🙏🙏💟💟💟🙏🙏🙏🙏
*आदर*

काळ्या मातीच्या प्रति आमच्या
मनी सतत वाढत रहावा आदर
तिला वाचवण्यासाठी हजारोंची
वळली जावी तिच्याकडे नजर

सिमेंटच्या जंगलांनी भूमातेचे
टाकले शरीर सारे पोखरूण
कुणालाच ऐकायला येत नाही
मनी चाललेले तिचे आक्रंदन

तिच्या नाशास कारणीभूत
बसावा प्लास्टिकला आळा
तिचा श्वास होईल मोकळा
अन गाईल सुमधुर गळा

रसायनीक खातांनी गांजली
काळी आमची माय भूमाता
कालांतराने संपूनच जाईल
नवनिर्मितीची तिची क्षमता

उजाड मोकळ्या काळ्या जमिनी
मैलोनमैल आ वासून पसरतील
कण अन कण निष्प्रभ होऊन
रक्षेसम चेतनाहिन होतील

वेळीच जागे व्हावीत मने
वाढावा तिच्या प्रति आदर
भरभरून देईल ती मानवा
अस्तित्वाची केलीत कदर

*सौ पुष्पलता मिसाळ सोलापूर*
🌼🔸🌼🔸🌼🔸🌼🔸🌼🔸🌼
 *कविता आदर*

असं मिळो सासर
सोडले मुलीने माहेर
सर्वांचा करो आदर
चुणूक दिसली घरभर

देते समाधान करते आदर
डोईवरून न हटला पदर
पहाटे घडयाळाचा गजर
संसाराला लागू नये नजर

मनोमंदिरी पूजा बांधली
आदराने कृष्ण मूर्त आत बैसविली
सुदर्शन चकर फिरविले
पार्थास बोधामृत पाजविले
लीन झाला म्हणूनी
तयांस चरणी थार देवविला
जगाने केला आदर
भगवदगीतेतील जाणूनी सार
सुखी होतो परिवार

*कविता बिरारी नाशिक*
🌼🔸🌼🔸🌼🔸🌼🔸🌼🔸🌼
करायला शिका आई-वडिलांच्या आदर
तेंव्हा जग हि करेल तुमची कदर

आईच्या आदराने मिळते जग जिंकण्याची हिंमत
नसे आदर आईचा तर शून्य असते जगण्याची किंमत

वडिलांच्या आदराने मिळते युद्ध जिंकण्याच पाठबळ
अनादर असेल तर जीवनाला केंव्हा हि लागेल गळ

आदर द्या आदर घ्या जगाची रीत भारी
आदराविना मातीमोल गोष्ट मात्र खरी

समाजा प्रति आदर, समाजात त्याची कदर
समाजाचा अनादर, नष्ट होईल तो लागून त्याला नजर

स्वतःचा आदर म्हणजे स्वाभिमान असतो जबर
आनंदा सगळ्यांचा च करा आदर हा एकच गजर

*आनंद बी वाव्हळे*
ता-सोनपेठ, जि-परभणी
🌼🔸🌼🔸🌼🔸🌼🔸🌼🔸🌼
*आदर*

मिळत नाही कधीही
पसरूनीया पदर
कर्तृत्वाच्या भूमीवर
पिकतो मात्र आदर//
बेदर्दी हा जमाना
इथे काय कुणाची कदर
आपुलकीच्या तरूवर
फुलारतो आदर//
नाती जुमानतो कोण?
आज माय असो फादर
त्याग कष्टाच्या खाणीत
मात्र सापडतो आदर//
स्वार्थान बोकाळलेलं
हपापलेलं वेदर
बाजारी का पैश्याने
विकत मिळतो आदर?//
वांझ ठरते मोठपणाची
फुकी भादर-भादर
तोंडाने का कधी कुणी
कमावलाय आदर?//
स्नेह त्याग कर्तृत्वाची
पांघरी जो चादर
नतमस्तकही होई तेथे
आदराने आदर//

*••••✍ *विजय बिंदोड*•••*
             ●पांढरकवडा●
             •यवतमाळ•
🌼🔸🌼🔸🌼🔸🌼🔸🌼🔸🌼
*आदर*

थोरांचा आदर करावा

सारे जन विसरले

अरे कारेची  भाषा

सारे बोलू लागले


आदर कसा करावा

याचे संस्कार असतात

घरातूनच त्याचे

बाळकडू मिळतात

आदराचे स्थान कमी

अनादर खूप वाढला

आदर देण्या साठी

सन्मानही बुडाला

*हेमंत चिटणीस*
परभणी
🌼🔸🌼🔸🌼🔸🌼🔸🌼🔸🌼
 *आदर*

आदर आहे मझ
माझ्या कुंकवाच्या टिळ्याचा...
याच टिळ्यातून फुलतात
भावना माझ्या मनीच्या....

नसेन मी जगासाठी
स्रीत्वाच्या कोशात रंगलेली....
परि मनीच्या संवेदनात मी
स्रीत्वाने पूर्ण फुललेली...

कूस माझी नसेन
शरीरातून उमललेली....
परि मनाची कूस माझी
सदैव मातृत्वाने बहरलेली.....

आदर आहे मझ
माझ्या साडीच्या पदराचा....
याच पदराने मी झाकला
डोह अनेकांच्या वेदनेचा....

नाकारला जगाने माझा
हक्क स्रीत्वाच्या पैलूचा...
तरीही मी आदर केला
माझ्या फुलणा-या जाणिवांचा.....

नसेन माझा श्रुगांर
स्रीत्वाच्या पट्टीतला...
मनाचा श्रुंगार माझा
लावण्याच्या नाजुक अदांतला....

स्विकारून मी कटुतेस
माझ्या भावनेचा प्राजक्त फुलविला....
तव प्राजक्ताच्या बहराने
नवशिशूंच्या मस्तकी सुगंधाचा सडा टाकिला.....

आदर आहे मझ
माझ्या आतील अस्तित्वाचा
किंनर असूनही मी सदैव
ठेवा जपला जीवनातील अमुल्य मुल्यांचा.....

आदर आहे मझला
माझ्या किंनर असण्याचा....
बघितला जगात मी क्रुर खेळ
नैसर्गिकतेच्या मुल्यांचा....

म्हणूनी मझ आदर आहे
माझ्या किंनरतेचा......
म्हणूनी मझ आदर आहे
माझ्या किंनरतेचा.....

*वैशाली देशमुख.*
जळगांव.
🌼🔸🌼🔸🌼🔸🌼🔸🌼🔸🌼
*आदर..*

आदर तो स्रीयांचा
असावा घरोघरी
जागर स्रीशक्तीचा
चेतवा मनोमनी...

वात्सल्याची खाण
प्रेमाची मुर्ती
दुर्गेचा तिला मान
अखंड ती स्रोत स्फुर्ती...

आईचा जिव्हाळा
बहिणीची माया
साथ पत्नीची आयूष्यभरा
नाना रुपे तिची झिजवती काया...

परस्री मातेसमान
वचन हे थोर
श्रेष्ठ किती ही विधात्याची देण
जागवा अंतरी ममत्वाची ज्योत...

जिजाऊ अन् सावित्री
तारा दुर्गा झाशीवाली रणरागिणी
कल्पना सुनिता अंतराळ यात्री
आदर स्रीशक्तीचा व्हावा मनामनातूनी...

*राजेंद्र पवार..इगतपुरी ..नाशिक*
🌼🔸🌼🔸🌼🔸🌼🔸🌼🔸🌼
 ***कविता~आदर***
नव ज्ञानाचा रवी सूर्य
या पृथ्वीवर जन्माशी आला
करूनी  आदर महामानवाला
तो सुत्रधार देशाचा ठरला

अज्ञानाचे करण्या उच्याटन
एकट्याणे तुच गाजविले रणांगण
विश्वाचे घेऊनी गुढ ज्ञान
प्रतिज्ञा दिली सत्याची मानवाला

 प्रज्ञेच्या तेजाने सुगंध दरवळला
 केलेस मुक्त भेदभावनेला
 चरित्र शुध्द मानव जन्मास आला
 आदराने वंदिते विश्व आज तुजला

 *जयू अरूण उराडे.चंद्रपूर*
🌼🔸🌼🔸🌼🔸🌼🔸🌼🔸🌼
*कविता - आदर*

जीवनगीत गाताना
हवी असते अनेकाची साथ
लहान असो का थोर असो
करुनी सकलांचा आदर घडवावे परमार्थ...

जो तो आपल्या परिने
आपल्या कार्यात महान
सर्वांचा मनी सन्मान
ठेवावा त्यांचा मान....

मनाच्या या गाभाऱ्यात
कोणी श्रेष्ठ ना कोणी कनिष्ठ
जपावा मनी आदर
सगळेच आपल्या ठिकाणी जेष्ठ ...

राजा असो वा रंक
राजास ही पडतो सवाल
दासच नसतील तर राजभवनात
कसा सजेल राजाचे रंगमहाल...

म्हणूनी उच्च निच नका मानू
कोणाचेही मन नका दूखवू
नका करु कोणाचा निरादर
जीवन जगताना ठेवा एकमेकांचा आदर...

   *सौ. सुचिता नाईक नांदेड*
🌼🔸🌼🔸🌼🔸🌼🔸🌼🔸🌼
 तव तुझ्या तेजाने
उजळल्या दाही दिशा
तेजोमयी भासली मज
अंधारलेली निशा

महामानवा तुझ्या आदरात
साऱ्या जगाचा सन्मान आहे
तुझे कर्तृत्व आकाशीचे
सूर्य - चंद्र न्याहाळून पाहे

*सौ.वैशाली अंड्रस्कर ,चंद्रपूर*
🌼🔸🌼🔸🌼🔸🌼🔸🌼🔸🌼
🙏🏻🙏🏻 *आदर* 🙏🏻🙏🏻

देशांच्या रक्षानासाठी
दिले ज्यानी बलिदान
तयाना प्रणाम सादर
सर्वानीच तयांचा करावा आदर

 आई वडील थोर
गुरूजन माझे ज्ञानाचे  भांडार
करितो त्यांचा मी आदर
तयाना साष्टांग नमस्कार
 देशाची आन बान शान
तिरंगा झेंडा महान
लोकशाहीचा संविधान आधार
देशाच्या स्वाभिमानासाठी
करुया सर्वांचा आदर

*ननुरे डी एन*
*प्रा शा धानोरा मोत्या*
*ता पुर्णा जि परभणी*

🙏🙏🙏🙏💟💟💟🙏🙏🙏🙏
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

     *🙏संकलन/ समुह प्रशासक*🙏
                *✍ लिना  वैद्य*
               📲९५०३४५२०७२
*©मराठीचे शिलेदार कविता/ चारोळी समूह*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🦋🔻🦋🔻🦋🔻🦋🔻🦋🔻
✍📚✍📚✍📚✍📚✍📚
    ➖➖➖➖➖➖➖➖➖➖
    *🔰मराठीचे शिलेदार समुहाचे ई - व्यासपीठ🔰*
   ➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*🔶 'मराठीचे शिलेदार (चारोळी)'  समुहात काल चारोळीसाठी देण्यात आलेल्या विषयावर निवडक समूह सदस्यांनी केलेले 'चारोळी लेखन'.*🔶
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
         *चारोळी समुह३,४व५*
           *संकलन ३*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*मराठीचे शिलेदार समुहाचा उपक्रम*🚩
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
            *विषय: आदर*
            *दि:26/09/17*
🙏🏽💐🙏🏽💐🙏🏽💐🙏🏽💐
           *48*
१.आदर करावा सर्वांचा
संस्कार हा मोलाचा
नम्रतेची जोड असावी त्याला
हाच धर्म मानवतेचा
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
२.जिथे आदर स्त्रीचा
तिथे लक्ष्मीचा वास
घरात नांदे सुख शांती
दूर होई दुःखाचा वास
*मंजू सराठे*
कल्याण , ठाणे          
🙏🏽💐🙏🏽💐🙏🏽💐🙏🏽💐
           *49*
मराठी बापाचा जेव्हा
बनला आँग्ल फादर्
नकळत मनातला बघा
निसटत गेला आदर
*सौ.वैशाली अंड्रस्कर ,चंद्रपूर*
🙏🏽💐🙏🏽💐🙏🏽💐🙏🏽💐
           *50*
१.देशांच्या रक्षानासाठी
दिले ज्यानी बलिदान
तयाना प्रणाम सादर
सर्वानीच तयांचा करावा आदर
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
 २.आई वडील थोर
गुरूजन माझे ज्ञानांचे भांडार
करितो त्यांचा मी आदर
तयाना साष्टांग नमस्कार
*ननुरे डी एन*
*प्रा शा धानोरा मोत्या*
*ता पुर्णा जि परभणी*
🙏🏽💐🙏🏽💐🙏🏽💐🙏🏽💐
            *51*
१.आदर करावा माता पित्याचा
आणि करावा मोठ्यांचा
नको नुसता देख दिखावा
मनी सुधा तो भाव राखावा
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
२ .आदर म्हणजे वाटणारे प्रेम
आदरातुन होतो वक्त होतो स्नेह
अदाराचे रूप अनेक पर भाव एक
प्रत्येक व्यकि अन स्वाभाव अनेक
     *नेहा जोशी नाशिक*
🙏🏽💐🙏🏽💐🙏🏽💐🙏🏽💐
            *52*
१.आईने दिले संस्कार
करू त्याचा आदर
जुळते नाते जयांशी
आदराने होतो स्विकार
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
२. तु प्रेमाचा सागर
तु वात्सल्याची मुर्ती
करावा किती आदर
तुझी निर्मळ कीर्ती
*सौ. सुजाता कुरे, सांगोला*
🙏🏽💐🙏🏽💐🙏🏽💐🙏🏽💐
               *53*
१.आदराने वागणे
अदबीने  बोलणे।
ही आहेत चांगल्या
व्यक्ती त्वाची  लक्षणे!!
🌸🌸🌸🌸🌸🌸
२.जेष्ठांचा करावा आदर
द्यावा नित्य सन्मान।
आपल्या साठी कष्टतात ते
 बाळगा त्यांचा अभिमान!!
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
३.नेहमी असावे
आदरपूर्वक  वागणे।
 इतरांचा सन्मान
   क्रुतीतून  दाखविणे!!
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
४.आदर करावा गुरूजनांचा
देतात    विद्यार्थ्यांना ज्ञान
विकास होतो बुध्दीचा
   पेलतो जीवनात आव्हान।।
🌸🌸🌸🌸🌸🌸
५. कुटुंबातच  शिकतो
 प्रेम आणि आदराची भावना।
त्या शिवाय जीवन ते
  व्यर्थ च असते, जाणा!!
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
६.आदराची भावना ती
आपली आपणच जपायची।
तडे गेले त्याला तर
पुन्हा  नाही  सावरत  ती।।
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
७.आई असते वात्सल्य मूर्ती
बाबा करूणेचा  सागर।
त्यांच्या विषयी मनी
 वसतो  विशाल *आदर*!!
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
८. आदर जपावा इतरांनी
 वागणे  असे  असावे।
 सन्माननीय होण्यासाठी
   आपण स्वतः ला तपासावे।।
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
९.निर्माण करावे लागते।
प्रयत्न पूर्वक मनाला
शिस्तीत ठेवावे लागते।।
*अरूणा दुद्दलवार*
🙏🏽💐🙏🏽💐🙏🏽💐🙏🏽💐
           *54*
१.काही धुर्त कोल्ह्याच्या
आदर फक्त ओठात असते
तोंडावर गोड बोलनं
विष बेंबीच्या देठात असते
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
२.एकदा तडकल गेलेला
विश्वास कधीच जुळत नाहीं
आदर निर्माण करावा लागतो
आपोआप,मागुन मिळत नाही
  *श्रीकांत अनमुलवार मुल*
🙏🏽💐🙏🏽💐🙏🏽💐🙏🏽💐
              *55*
१. आदर मनातच
 असावा लागतो
उसना दिखाऊ
टिकणारा नसतो....!!!
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
२. आदर करणे आणि प्रेमाने वागणे
बाळकडू सर्वानाच मिळतं
मोठ झाल्यावर कोण आठवतं
कोण सगळीशिकवणी पाळतं?......
    *सौ अलका देशमुख*
अमरावती
🙏🏽💐🙏🏽💐🙏🏽💐🙏🏽💐
             *56*
आदर एक भावना
जी कधीच मागून मिळत नाही
जेवढी दुसर्यांबद्दल बाळगाल
त्याच्या कैक पटीने तुम्हाला मिळत जाई....
      *सौ अमरजा पुजारी*
          सांगोला
🙏🏽💐🙏🏽💐🙏🏽💐🙏🏽💐
                *57*
१.आदर मनातूनी करावा
नुसता देखावा नको
संस्कृतीची जपणूक करावी
नुसताच दिखावा नको
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
२.आदर भाव सर्वांनी
मनी हा रुजवावा
संकटात नेहमीच आपण
मदतीचा हात द्दावा
*✍संध्याराणी कोल्हे*
    कळंब जि.उस्मानाबाद
🙏🏽💐🙏🏽💐🙏🏽💐🙏🏽💐
             *58*
१.थोरांचा आदर करावा
सारे जन विसरले
अरे कारेची  भाषा
सारे बोलू लागले
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
२.आदर कसा करावा
याचे संस्कार असतात
घरातूनच त्याचे
बाळकडू मिळतात
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
३.आदराचे स्थान कमी
अनादर खूप वाढला
आदर देण्या साठी
सन्मानही बुडाला
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
४.आदर व्यक्त करण्या
पात्रता असावी लागते
कोणालाही त्याची
कल्पना का बरे नसते
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
५.आदर कमी झाला
तरी घाबरू नये
सन्मान वाढविण्या
कमी कधी पडू नये
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
६.आदर प्रत्येकाचा
सन्मान महत्वाचा
मोठेपणा देण्याचा
बहुमान गौरवाचा
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
७.आदर व्यक्त करण्या
पात्रता असावी लागते
कोणालाही त्याची
कल्पना का बरे नसते
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
८.आदर कमी झाला
तरी घाबरू नये
सन्मान वाढविण्या
कमी कधी पडू नये
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
९.आदर प्रत्येकाचा
सन्मान महत्वाचा
मोठेपणा देण्याचा
बहुमान गौरवाचा
  *हेमंत चिटणीस*
🙏🏽💐🙏🏽💐🙏🏽💐🙏🏽💐
          *59*
आदर असावा शब्दांमध्ये
अन ठेवावा सर्वांचा मान...
 हीच देशाची संस्कृती
आणि हीच आपुली शान...
   *प्रतिभा गवळे*
🙏🏽💐🙏🏽💐🙏🏽💐🙏🏽💐
          *60*
माय मराठी नांदते
महाराष्ट्राच्या घराघरात
आदर मातृभाषेचा
प्रत्येकाच्या मनामनात.
*सौ.ऊर्मी (हेमश्री)घरत.पालघर*
       ➖➖ ➖➖➖➖➖➖➖
       *🙏संकलन/ समुह सहप्रशासक*🙏
     *✍ सौ.ऊर्मी (हेमश्री)  घरत.पालघर.*
   *©मराठीचे शिलेदार (चारोळी) समूह*
      ➖➖ ➖➖➖➖➖➖➖
https://www.facebook.com/groups/100274427177019/
📚✍📚✍📚✍📚📚✍📚✍📚✍📚

➖➖➖➖➖➖➖➖➖➖


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: