भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना
आपणास सूचित करण्यात येते की, स्वाधार योजनेसाठी अर्ज भरण्याची अंतीम मुदत दिनांक 31 मार्च 2017 पर्यन्त वाढविण्यात येत आहे.
महाविद्यालयांनी नवीन व नुतनीकरणाचे अर्ज सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांच्याकडे ऑनलाईन फॉरवर्ड करण्याकरिता अंतीम मुदत दिनांक 30 मार्च 2017 असेल. त्यानंतर प्राप्त होणारे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती व शिक्षण शुल्क, परिक्षा शुल्काची जबाबदारी महाविलयांची असेल.
आपणास सूचित करण्यात येते की, सन २०१६-२०१७ करीता अनुसूचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्र विद्यार्थ्यांसाठी भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती तसेच शिक्षण फी, परीक्षा फी धारक विद्यार्थ्यांनी प्रथम वर्षासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतीम मुदत दिनांक 15 मार्च 2017 रोजी समाप्त झाली आहे.
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना
अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी निकष, अटी, शर्ती व अर्जाचा विहीत नमुना.
परिपत्रक :
दोन किंवा दोन पेक्षा जास्त वेळा अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्याना शिक्षण शुल्क व परिक्षा शुल्क प्रतिपुर्ती न करणेबाबत....
आधार क्रमांक बँक खात्याशी संलग्न करण्यासाठीची माहिती आणि आधार संमती अर्ज
मागासवर्गीय विद्यार्थ्यांना भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती आणि राज्य शासनाची शिक्षण फी परिक्षा फी मिळणेसाठी आवेदन पत्र भरतांना आधारकार्ड, बँकेचे खाते क्रमांकाची माहिती सादर करणेबाबत विद्यार्थी, पालक व महाविद्यालयांना आवाहन
प्रवेशित (जुन्या) विद्यार्थ्यांचे अर्ज नुतनीकरण करण्यासाठी महाविद्यालयाकरिता माहिती पुस्तिका २०१५-२०१६
अर्जाची स्वीकृती करताना संबंधित महाविद्यालयाने रजिस्ट्रेशन नंबरमध्ये विद्यार्थ्याचा जनरल रजिस्ट्रेशन नंबर भरावा.
सर्व विद्यार्थ्यांना विनंती करण्यात येते की, त्यांची शिष्यवृत्ती त्यांच्याच खात्यात जमा होण्यासाठी कृपया त्यांनी आपला आधार क्रमांक बँक खात्याशी संलग्न करावा. तसेच शिष्यवृत्तीचा/ शिक्षण फी परीक्षा फी चा ऑनलाईन अर्ज भरतानासुद्धा अचूक आधार क्रमांक व बँकेचा खातेक्रमांक न विसरता लिहावा. ज्यामुळे आपली शिष्यवृत्ती आपल्याच खात्यावर जमा होईल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा