नमस्कार मित्रांनो.
मी श्री. ननुरे डी. एन.(प्राथमिक शिक्षक)
प्रा. शा. धानोरा मोत्या क्र.1
ता.पूर्णा जि.परभणी येथे कार्यरत असून
सदरील शाळेत ज्ञानरचनावादी व डिजिटल
साधनाद्वारे अद्ययावत ज्ञान मुलांना दिले जाते.
विशेष म्हणजे सशालेय उपक्रमाची अमलबजावणी आगदी काटेकोरपणे करत आसल्याकारनाने इयत्ता १ ली पासुनचे विद्यार्थी आत्मविश्वासाने भाषण करतात .
माझ्या मार्गदर्शना खाली विद्यार्थी राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेतपर्यंत यश संपादन केले आहेत. २०११ माझ्या प्रथम नेमणूकी पासुन हे कार्य अविरत चालु आहे.
कु.भाग्यश्री पंढरीनाथ मोहिते हि ६ वी ची विद्यार्थीनीने बालव्याख्याती म्हणून नांदेड,हिंगोली,परभणी जिल्ह्यात प्रसिद्धी मिळविलेली आहे.विद्यार्थी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वतः करतात.
इयत्ता २ री पसुनची विद्यार्थी सुंदर कविता ,कथा , संवाद लेखन करतात .अशी ही सुंदर माझी शाळा.
..............उपक्रमांची क्षणचित्रे................