उपक्रमशील शाळा धानोरा मोत्या क्र.१

         उपक्रमशील शाळा धानोरा मोत्या क्र.१
     जि.प.प्रा.शाळा धानोरा मोत्या  क्र. १ केंद्र कावलगाव तालुका पूर्ण जिल्हा परभणी या शाळेत विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी वैविध्यपूर्ण उपक्रम घेतले जातात.वैविध्यपूर्ण व परिपूर्ण परिपाठ द्वारे प्रत्येक विद्यार्थ्यांचा सहभाग घेऊन बोलतं केलं जातं इयत्ता ३री पासूनचे विद्यार्थी स्वयंरचित  सुंदर कविता तयार करतात.
     सहशालेय उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांत शाळे विषयी आवड व गोडी निर्माण झाली आहे महापुरुषांच्या जयंती व पुण्यतिथीनिमित्त शाळेत वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले जाते यातुनच परिसर,तालुका,जिल्हा,विभाग व राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेपर्यंत या शाळेतील विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे.
     गणेश उत्सव,दुर्गा महोत्सव,शिवजयंती महोत्सव यात सद्य परिस्थितीतील ज्वलंत समस्या भ्रूणहत्या,बेटी बचाओ बेटी पढाओ,हुंडाबंदी,भ्रष्टाचार,शेतकरी आत्महत्या, स्वच्छ भारत अभियान,राष्ट्रीय एकात्मता, पाणीबचत,लेक शिकवा अभियान,ग्रामस्वच्छता अभियान,संविधान जनजागृती या सारख्या अनेक समस्यांची जनजागृती करण्यासाठी या शाळेतील कु.दिव्या यज्ञकांत वाघ, साईनाथ  प्रभाकर मोहिते,साईनाथ भाऊराव वाघ,कु.द्वारका नारायण रहाटकर,कु. आकांक्षा नरेंद्र बनबरे,साक्षी गणेश मोहिते,साक्षी मारोती मोहिते,अगदी लहान वर्गातील सध्या वर्ग दुसरीत शिकणारा त्र्यंबक मारोती मोहिते व बालव्याख्याती म्हणून शिवजयंती महोत्सवात शिवाजी महाराजांचा धगधगता इतिहास व माझ्या स्वप्नातील भारत या विषयावर राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेमध्ये सुद्धा यश संपादन करणारी धानोरा मोत्याचा बुलंदआवाज कु.भाग्यश्री पंढरीनाथ मोहिते वर्ग-७ वा
               कु.भाग्यश्री पंढरीनाथ मोहिते ही तर सर्व महाराष्ट्रभर बालव्याख्याती म्हणून प्रसिद्धी मिळविली आहे पहाडीआवाजात छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास ऐकुन समोरची मंडळ अगदी मंत्रमुग्ध होतात.
       ' छत्रपती शिवरायांचा धगधगता इतिहास ' वरुड ता.कळमनुरी जि.हिंगोली आयोजित राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत मांडलेला विषयाचे सर्वांनी कौतुक केले व येथे तृतीय क्रमांक पटकावला.
   खुदनापूर ता.वसमत ज.हिंगोली येथे विभागीय वक्तृत्व स्पर्धेत तिने मांडलेला ' माझ्या स्वप्नातील भारत ' हा विषय तेवढाच गाजला यात तिला उत्तेजनार्थ क्रमांक मिळाला सदर स्पर्धेत नामांकित संस्थेच्या विद्यार्थ्यांत बक्षीस पटकावणारी जिल्हा परिषद शाळेची एकमेव विद्यार्थिनी ठरली.
    अनेक कार्यक्रमांसाठी बालवक्ता म्हणून  हजेरी लावणारी कु.भाग्यश्री पंढरीनाथ मोहिते ही सन-२०१७ च्या शिवजयंती महोत्सवात अमोल दादा मिटकरी यांच्या सारख्या महान व प्रसिद्ध वक्त्या सोबत प्रमुख बालवक्ता म्हणून एका मंचावर आले असताना तिचे भाषण ऐकून अमोल दादा मिटकरी आवाक झाले व तीचे कौतुक केले.शिवजयंती महोत्सवात हा परिसर तीने आपल्या आवाजाने दणाणून सोडला.
             या सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे उपक्रमशील शिक्षक श्री.ननुरे डी.एन.(प्राथमिक शिक्षक )प्रा.शा.धानोरा मोत्या क्र.१ ता.पूर्णा जि. परभणी.सरांच्या मार्गदर्शन व संहिता लेखनाने वक्तृत्व स्पर्धेत या शाळेतील विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धे पर्यंत यश मिळविले आहे. सरांच्या मार्गदर्शनामुळे शाळेतील विद्यार्थी प्रत्येक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वतः करतात एक मुलगा एक मुलगी याप्रमाणे टीव्हीवरील कार्यक्रमाप्रमाणेच सुंदर अँकरिंग सुधा करता.
        या सर्व विद्यार्थ्यांच्या यशामध्ये श्री.सुंदर धवन (केंद्रप्रमुख), श्री. बि.आर.देसाई (केंद्रीय मु.अ.कावलगाव), श्री.यरगलवाड बी.एल.(मुख्याध्यापक ),श्री वंजे व्ही.एन ,श्री. मोरतळे आर.डी.श्री.तोगरवाड एस.एम., श्री गडगिळेआर.एस.सौ.नांदलगावकर व्हि.डी. सौ.फुके एम डी.,श्री.हातागळे आर.पी. श्री ननुरे डी.एन.या सर्वांचा सिंहाचा वाटा आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: